महामार्गावरील अपूर्ण नाला बांधकामामुळे शेतीचे नुकसान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

महामार्गावरील अपूर्ण नाला बांधकामामुळे शेतीचे नुकसान


गडचिरोली, ता. २७ : गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील कुनघाडा फाटाजवळील अपूर्ण नाला बांधकाम व पुरामुळे लगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले दरम्यान खा. अशोक नेते यांनी बुधवार, 26 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. अपु-या नाल्याच्या बांधकामामुळे पुराचे पाणी शेतात गेल्याने पिकांची नासधूस झाल्याचे यावेळी निर्दशनास आले.
अपूर्ण नाला बांधकामामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पेरणी केलेले पूर्ण पीक सडून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. याची वेळीच दखल घेत खा.अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंत्राटदार व जिल्हा प्रशासन यांना संबंधित शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या. यावेळी दिशा समितीचे सदस्य प्रकाश गेडाम, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, स्वीय सहाय्यक रविंद्र भांडेकर उपस्थित होते.