पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑगस्ट २०२०

पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांना श्रद्धांजली


जुन्नर /आनंद कांबळे
दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे आज दुपारी एक वाजता व्रुद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे व्रुत्तपत्र व्यवसायावर शोककळा पसरली आहे
जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांनी पिंपरी पेंढारमधील गायमुखवाडी या ठिकाणी आपल्या शेतात घर बांधून त्या ठिकाणी ते रहात आहेत त्यांनी सुरवातीच्या काळात मुंबईत आंबिका न्यूजपेपर एजन्सी या नावाने वर्तमान पत्रांची एजन्सी सुरु केली त्यानंतर त्यांनी आपला वार्ताहर मुंबई चौफेर पुण्यनगरी ही स्वतःची वर्तमानपत्रे सुरु केली त्यांचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी धाडसी निर्णय घेऊन ही वर्तमानपत्र सुरु केली मराठी वर्तमान पत्राबरोबरच कर्नाटक मल्ला हे कन्नड दैनिकही त्यांनी सुरु केलेनंतर त्यांनी मुंबईत स्वतः प्रिंटिंग प्रेस सुरु करुन हा व्यवसाय नावारूपाला आणला त्यांनी जेंव्ह ही वर्तमानपत्रे सुरु केली तेंव्हा त्याचे वितरण करण्यासाठी ते स्वतः गाडीबरोबर जात होते अत्यंत कष्टमय जीवनामधून त्यांनी आंबिका प्रिंटर्स आणि पब्लिकेशनचा व्याप वाढविला त्यांनी अनेक बेरोजगार तरूणांना आपल्या या व्यवसायात नोकरी देऊन त्यांचे संसार फुलविले एव्हढेच नाहीतर अनेकांना आपल्या वर्तमानपत्रांची एजन्सी देऊन त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीत हातभार लावला कमी शिक्षण असतानाही त्यांनी आपले प्रगतीचे धेय्य गाठले बाबांचे व्यवसायाबरोबरच शेतीवरही नितांत प्रेम आणि श्रद्धा होती एव्हढ्या व्यापातूनही ते आपल्या शेतीकडे लक्ष देत होते ते आपले संपूर्ण जीवन कष्टमय जगले त्यांनी केलेल्या कष्टाची आणि त्यामधून मिळविलेल्या यशाची राज्यातील अनेक संस्थांनी त्यांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे त्यांच्यामागे पत्नी तिन मुले मुली सुना नातवंडे असा परीवार आहे

वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला

मुंबई, दि. ६:- वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचा सर्वेसर्वा असा प्रेरणादायी प्रवास पुण्यनगरी वृत्त समुहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे थांबला आहे. त्यांची मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

       मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतातशिंगोटे बाबांकडे कष्टाळू वृत्ती होती. मुंबईत येऊन फळ विक्रेतावृत्तपत्र विक्रेता अशी कष्टाची काम करतानाही त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र असावेअसा ध्यास घेतला. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेही साक्षीदार होते. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल आणि आवडेल अशा भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करणे सुरु केले. त्यातूनच त्यांच्या वृत्तपत्र समुहाचा विस्तार झाला. मराठी सोबतच अन्य भाषांत दैनिक प्रकाशित करणारे ते एकमेव मराठी होते.त्यांची वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला. ज्येष्ठ संपादक मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.पुण्य नगरी’ वृत्तसमुहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी
                                                                                                            -उपमुख्यमंत्री अजित पवार

         मुंबई दि. 6: दैनिक पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापकसंपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर शिंगोटे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

               उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतातजुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्यकष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. पुण्य नगरीमुंबई चौफेरआपला वार्ताहरकर्नाटक मल्ल्यातमिळ टाईम्सयशोभूमीहिंदमाता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठीहिंदीतमिळकन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.

---------

ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे
एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड
                                                                                                                        - छगन भुजबळ

            मुंबईदि.6  :- दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं दु:खद निधन झाल्याचं वृत्त समजल. अत्यंत दु:ख झालं. मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने आज एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याच्या शोक भावना  अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

            शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे कीमुळचे जुन्नर तालुक्यातील असलेले मुरलीधर शिंगोटे यांनी केवळ इयत्ता चौथी पर्यंत घेतलेलं शिक्षण अर्थवट सोडून नोकरी व्यवसायासाठी मुंबईची वाट धरली. सुरुवातीला पडेल ती कामे करुन उदरनिर्वाह केले आणि त्यातूनच बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाची कामे सुरु केली. त्यानंतर हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु करत आणि अल्पावधीतच मराठीगुजरातीहिंदीइंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठ यश मिळवलं. त्या काळात अख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था जुन्नरच्या दोन तरुणांनी ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील इनाडूगुजरातमधील गुजरात समाचारसंदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात घेत  80 ते 90 च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेलं व्यक्तीमत्व म्हणून स्व.शिंगोटे यांच्याकडे पाहिलं गेलं. 

            स्व.मुरलीधर शिंगोटे यांनी माझ्या माझगाव मतदारसंघातील छोट्याश्या प्रेसमधून मुंबई चौफेर तसेच पुण्यनगरी या वर्तमानपत्रांची सुरुवात केली. त्यांच्याकडे वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी असल्याने वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.यासाठी प्रसंगी त्यांनी स्वतः वर्तमान पत्राचे गठ्ठे वाहून नेत त्याचे वितरण देखील केले. अपार कष्टाच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात काम सुरु केल्यानंतर त्यांनी परत मागे वळून बघितले नाही. त्यांनी पुढे दैनिक वार्ताहरदैनिक यशोभुमीदैनिक कर्नाटक मल्लातामिळ टाईम्सहिंदमाता यासारखी दैनिक सुरु करत पुण्य नगरी समूहाच साम्राज्य निर्माण केलं. पत्रकारिता क्षेत्रात समर्पित भावनेतून काम करत असतांना मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अभूतपूर्व असं काम उभं केलं. त्यांच्या निधनाने आज एक समर्पित व्यक्तीमत्व कायमच हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय शिंगोटे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
00000

मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाबद्दल शोक
                                             -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
            मुंबईदि. 6 : दै. पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोक संदेशात श्री चव्हाण म्हणतात,  
            पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वितरण क्षेत्रातील अनुभव व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एकाहून एक सरस प्रकाशने काढली. त्यांचा जीवनप्रवास नेहमीच स्मरणात राहणारा ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
------------------------

मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीची हानी
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉराजेंद्र शिंगणे
            मुंबईदि. 6दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची हानी झाली आहेअशा शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री डराजेंद्र शिंगणे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
            शिंगणे आपल्या शोकसंदेशात म्हणतातबाबा शिंगोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च 1938 ला झाला होता. शिक्षण सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला वृत्तपत्र टाकण्याचे काम त्यांनी केले. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईलअशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. सन 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. त्यानंतर दैनिक आपला वार्ताहरदैनिक यशोभुमीदैनिक कर्नाटक मल्लातामिळ टाईम्सहिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.
            त्यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीतील एक अध्याय समाप्त झाला आहे असेही डशिंगणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.
00000मुरलीधर  शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा  प्रवास प्रेरणादायी
                                                                   - अमित देशमुख

          
मुंबई दि.6: पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त  दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.
            श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,  वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजता आणि वाचता येणारे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहरदैनिक यशोभुमीदैनिक कर्नाटक मल्लातामिळ टाईम्सहिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक/ संस्थापक हा प्रवास थक्क
करणारा असून त्यांनी या क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.