सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन : धनंजय मुंडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ ऑगस्ट २०२०

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन : धनंजय मुंडे

मुंबई, 28 : सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडेसमाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडेसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळेसफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमारविविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणसार्वजनिक आरोग्यनगरविकास 
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
         श्री मुंडे म्हणालेसफाई कामगारांबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत  प्रयत्न करणार असल्याचेही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.