भिवाडे बुद्रुक येथे जमिनीला भेग; ग्रामस्थांमध्ये घबराट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

भिवाडे बुद्रुक येथे जमिनीला भेग; ग्रामस्थांमध्ये घबराट

जुन्नर दि. २५ वार्ताहर सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीला जवळपास 300 मीटर लांबीची भेग पडल्याने जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे ग्रामस्थांमध्ये घबराट  पसरली आहे. या भेगेने घरांचे नुकसान झाले आहे, प्रशासनाने या घटनेकडे  गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याचे  ग्रामस्थांनी सांगितले

 भिवाडे बु. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे, डोंगराळ भागात मोठी भेग पडल्याची घटना शनिवार (ता. 22 रोजी) घडली होती.

शिवाजी विठ्ठल विरणक यांच्या घरापासून ते नदीपर्यंत अंदाजे 300 मीटरपर्यंत जमिनीला  भेगा पडल्या आहेत. जमीन काही ठिकाणी खचली असून विद्युत खांब तसेच  विहिरींचे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातील पाणी  मुरून  पाणी गावात मुरून थेट नदीमध्ये निघत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पडलेल्या भेगीमुळे भिवाडे येथील रामशेज तलावास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाजी विरणक यांच्या घरकुलाचे तसेच  भीमाबाई विरणक यांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.

तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन  तातडीने पंचनामे करण्याचे आदेश  दिले. दरम्यान शासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आदिवासी भागातील कार्यकर्ते दत्ता गवारी व विष्णू घोडे यांनी केली.***फोटोओळ---आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे  जमिनीत पडलेल्या भेगेने घराचे झालेले  नुकसान