मराठी कवी लेखक संघटना राज्य सचिवपदी प्रा. कीर्ती काळमेघ वनकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

मराठी कवी लेखक संघटना राज्य सचिवपदी प्रा. कीर्ती काळमेघ वनकर


नागपूर/ प्रतिनिधी
मराठी कवी लेखक संघटनेच्या राज्य सचिव पदी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद च्या नागपूर जिल्हा प्रवक्ता प्रा कीर्ती (काळमेघ) वनकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

प्रा, कीर्ती या उच्च विद्याभूषित असून त्या कथा,कविता यांचे सदैव लेखन करतात, त्यांचे प्रासंगिक लेख नामवंत वृत्त पत्रामधून प्रसिद्ध होत असतात,त्या आमची माती आमची माणस व कृषिदर्शन* या मालिकेत दूरदर्शन वर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतात. त्या नागपूर येथे भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. सर्वच क्षेत्रात त्यांचे लिलयावर असून त्या उत्कृष्ट निवेदिका आहे,मराठी कवी संघटनेच्या कामात फार मोठे योगदान आहे,त्यांच्या निवडीबद्दल डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर ,राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते,हर्षा वाघमारे, प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे,विनोद चिकटे,मेघराज गवखरे,सुरेंद्र बनसिंगे,बाबा नागपुरे, स्वप्नील ठाकरे,योगेश कडू,गुणवत्ता देव्हाडे,लोकोत्तम बुटले,चेतना कांबळे, विजय कांबळे,राजेश मालापुरे, संजीव शिंदे,गौरव शिंदे,प्रिया इंगळे,पुप्पा कोंडलवार,संगीता ठाकरे,नंदा वाळके,चेतन बमनोटे आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले,त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे,