आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ ऑगस्ट २०२०

आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला


माणिकगड पहाडावरील घोडणकप्पी या आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला. येथील ग्रामस्थांना आतापर्यंत साध्या ग्रामपंचायतीच्या कारभारातही सहभाग घेता आले नाही. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताही नाही. डोंगर उतरून गुड्यापर्यंत जावे लागते. पाण्याची सुविधा नाही. असुविधेचा सामना करीत प्रचंड हालअपेष्टा सहन करीत असलेल्या येथील ग्रामस्थांना आज एक आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी आज पहीली ग्रामसभा अनुभवली. ग्रामसभेत विषयांवर चर्चा करतांना अबोल्या महीलांच्या ओठावर वेदनांचे हुंकार उमटून आले आणि त्या बोलक्या झाल्या. त्र्याहत्तर वर्षात त्यांना आपले प्रश्न मांडायची संधी मिळाली नव्हती. आज त्यांनी संधीचे सोने केले. आपल्या वेदनांना शब्दात व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी पहील्यांदाच अनुभवले. आज त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव आला.
ज्या डोंगरकपारीत त्यांचे भविष्य गडप झाल्याचा अनुभव ते घेत होते, त्याच डोंगरकपारीत आज स्वातंत्र्याचे मंगलमय सूर निनादले. रस्ता, पाणि, आरोग्य, शिक्षण, निवारा यासारख्या सुविधा आपल्या आवाक्यातच असल्याचा नवा व आल्हाददायी अनुभव आज घोडणकप्पी वासियांनी घेतला.
या उपक्रमाला पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, स्वरप्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते यांनी भरघोस पाठबळ दिले. याशिवाय माजी आमदार अँड. वामनराव चटप साहेबांनी या कार्यक्रमात जीव ओतला. सौ. अल्काताई सदावर्ते व कु. पुजा टोंगे यांनी स्वातंत्र्यगीते गाऊन उल्हास निर्माण केला. उपेक्षित वस्तीवर नव चैतन्य निर्माण करण्याचा एक क्षण आमच्या सर्वांच्याच पर्वात जोडल्या गेले. ख-या अर्थाने अंधार चिरून काढणारा एक किरण येथे पसरविता आले, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ?
सहकार्य करणा-यांची यादी खूप मोठी आहे.