सुजलामच्या स्वप्नात गोसेखुर्दने माजविला कहर gosekhurd - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०२०

सुजलामच्या स्वप्नात गोसेखुर्दने माजविला कहर gosekhurd
सावली/ प्रतिनिधी
वैनगंगेला गेल्या शंभर वर्षांत जेवढे महापुर आले नाहीत तेव्हढे महापुर या वर्षात आता आले आहे. वैनगंगेच्या नदी तीरावर वसले एक गाव भान्सी ता. सावली. जि. चंद्रपूर हया गावाला पुराच्या पाण्यानी वेढलेले आहे. शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास महापुराने हिरावुन घेतला आहे. तरी तलाठी साचा क्र. 16कापशी, मा. तहसीलदार सावली, मा. कृषी अधिकारी सावली यांनी, भान्सी, चक वढोली, वढोली चक, ऊपरी चक ईत्यादी गावाचे त्वरीत सर्व्हे करुन, शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य सहकार्य करा, असे पुरपिडीत शेतकऱ्यांची शासकीय यंत्रणेला कळकळीची विनंती आहे. गोसीखुर्द आणि ईतर वरील धरणाचे दरवाजे बंद करा, आणि वैनगंगेच्या काठावरील खालच्या गावाला वाचवा वैनगंगेच्या काठावरील जनतेची मागणी आहे.