गोळीबार प्रकरणातील आरोपी सख्खे भाऊ पोलिसांना शरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ ऑगस्ट २०२०

गोळीबार प्रकरणातील आरोपी सख्खे भाऊ पोलिसांना शरण
बल्लारपूर शहरात आज दिवसा ढवळ्या एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज बौरिया असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांनतर बल्लारपूर शहरात अनेकांनी जमाव केला असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.बल्लारपूर गोळीबार प्रकरणात आरोपी असलेले दोन सख्खे भाऊ पोलिसांना शरण - पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल - पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात

या घटनेनंतर आरोपीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर केल्याची माहिती आहे.अमन आणि चीना असे आरोपींची नाव आहेत. आज दुपारी २ ते तीन च्या सुमारास गांधी काँप्लेक्स येथे अज्ञात इसमांनी गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली.सुरज बौरिया असे मृत इसमाचे नाव आहे.सुरज बौरिया याला जवळपास चार ते पाच गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बालारपूर पोलीस करीत आहेत.