मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधी मृत्युने कवटाळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०२०

मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधी मृत्युने कवटाळले
गजेंद्र डोंगरे/बाजारगाव
येथून ५ किमी अंतरावर असलेल्या गरमसूर येथे राहणारे उकंडराव गोविंदराव राठोड ( ४४) यांना दोन मुली व १मुलगा व पत्नी असा आनंदी परिवार , एकीकडे संपुर्ण भारतवासी १५ आॅगस्ट चा राष्ट्रीय सन साजरा करीत असतांना राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.सविस्तर घटना अशी की दि १५/८/२०२० ला सकाळी उकंडराव राठोड हे आपल्या दुचाकी क्र. एम. एच. २७ बी. इ. ३९७०ने जवळच असलेल्या काथलाबोडी येथे काही कामा निमित्त गेले व परत येत असतांना स्टार की पाइंट रिसोर्ट समोर विरूद्ध दिशेने येणा-या पिकअप गाडी क्र.एम.एच.४० बी. एल. ६९६७ ने जोरात धडक दिली, त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वाटेतच प्राणज्योत मालवली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
एकीकडे लाडात वाढविलेल्या दोन मुली व १मुलगा नावे किरण(२३), व आरती (२२) या दोन्ही मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करू हा आनंद मनात असतांना कोराना आजार असल्याने ते लग्न पुढील वर्षी करू म्हणून ६मे ला होणारा लग्नोत्सव् पुढे राबविला परंतु तो आनंद नियतीला मान्य नव्हता , व काल दि १५/८ला अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले १मुलगा केलटेक्स कंम्पनीत काम करतो त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी व एकीकडे वडीलांचे अपघाती निधन यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य दु:खाच्या गर्तेत आहेत