स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेते : दिलीप पनकुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० ऑगस्ट २०२०

स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेते : दिलीप पनकुले



नागपूर/ प्रतिनिधी
स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील व युवकाचे प्रेरणास्थान असलेले महान नेते होते. भारतासारख्या प्रगतीशील देशात राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचा बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही असे मनोगत आज त्यांच्या ७६ व्या जयंतीदिना निमित्य राजीव गांधी चौक (अजनी चौक) वर्धा रोड येथे स्थापन केलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली वाहताना दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता काँग्रेस पार्टी तर्फे सद्भावना दिन साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीनानाथ पडोळे, सजय दुधे दक्षिण - पश्चिम अध्यक्ष देविदास घोडे, संजय शेवाळे, भाईजी मोहोड, सोपानराव सिससाट, वसंत घटाटे, मच्छिंद्र आवळे, छ्त्रपती बोकारे सरदार चरणजितसिंह चौधरी, विजय मसराम, सूरज बोरकर, राजेश तिवारी, प्रामुख्याने उपस्थित होते.