भिंत कोसळली; निफंद्रा येथे दोन वर्षीय बालकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑगस्ट २०२०

भिंत कोसळली; निफंद्रा येथे दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज



सावली/ प्रतिनिधी
तालुक्यातील निफंद्रा येथे आज दुपारच्या सुमारास घराची भिंत कोसळली. यात दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. साई महेश गंङाटे असे मृत बालकाचे नाव आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाची सर सुरू आहे. त्यामुळे घराची भिंत जिर्ण झाली. आज दुपारी दोन वाजता दोन मुलं खेळत असताना अचानक घराची भिंत कोसळली. त्यात एक बालकांचा मृत्यू झाला. सतत येत असलेला रिमझिम पावसामुळे घराची भिंत पडून येथील इंदिरानगर वार्डातील मृतक साई महेश गंडाटे दोन वर्ष त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत खेळत असलेला जयंत लूमाजी नागपुरे वय पाच वर्ष किरकोळ जखमी झालेला आहे.