प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन : आमदार जोरगेवारांनी केली मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑगस्ट २०२०

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन : आमदार जोरगेवारांनी केली मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चासि.एस.टी.पी.एस. येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु


सि.एस.टी.पी.एस.येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सूरु असून येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी आंदोलकर्त्यांना समक्ष दुरध्वनी वरुन चर्चा केली आहे. यावेळी आ. जोरगेवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त सचिन ठाकरे यांनीही दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली या विषयासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत सदर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. विषेश म्हणजे आज सकाळपासूनच आमदार किशोर जोरगेवार यांची आंदोलनस्थळी उपस्थिती आहे.

जमीन अतिग्रहीत करुनही प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्याने सि.एस.टी.पी.एस. येथील ७ प्रकल्पग्रस्तांनी शीमनीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असुन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालवण्याची भिती निर्माण झाली आहे. या आंदोलनाचे गांभिर्य लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार हे आज सकाळपासूनच आंदोलनस्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहण केल्या जात आहे. दोन दिवसापासून आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चा करत प्रगल्पग्रस्तांची मागणी लक्षात आणून दिली होती. मात्र प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरुच ठेवले होते. परिणामी आज दुस-या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरुच आहे. आज सकाळपासून आमदार किशोर जोरगेवार हे सातत्याने आंदोलन सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करत असून आज त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत सदर आंदोलनाची माहिती दिली. यावेळी या प्रकल्पग्रस्तांच्या न्यायक मागण्याबाबतही आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांना माहिती दिली. तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी प्रकल्पग्रस्त यांचा मुख्यमंत्री यांच्याशी संवाद करून दिला.दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी उद्या नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार असून यात खासदार बाळू धानोरकर व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही व्ही. सी. द्वारे सहभागी होणार असून या बैठकीत प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.