वाघाच्या हल्यात गुराखी जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ ऑगस्ट २०२०

वाघाच्या हल्यात गुराखी जखमी




पाथरी : - सावली तालुक्यातील वनविभाग सावली वनपरिक्षेत्रातील खानाबाद बिटात येत असलेल्या कक्ष क 151 येथे शुकवार रोजी गुराखी जंगलात गुरे चराईसाठी गेला असता अचानक त्याचावर पट्टेदार वाघाने त्याचावर हल्ला करून जखमी केले.

निलकंठ रघु वाघरे वय 68 रा . सायखेडा असे जखमी गुराख्याचे नाव असुन नेहमीप्रमाने शुकवार रोजी गुरे चराईसाठी खानाबाद बिटात येत असलेल्या कक्ष क . 151 या जंगलात गेला असता सायं . चारचा सुमारास अचानक त्याचावर पट्टेदार वाघाने हल्ला केला त्याचावर हल्ला होताच त्यानी आरडाओरड केली असता वाघाने तिथुन पळ काढला यामुळे त्याचे प्राण वाचले परंतु त्याच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या या घटनेची माहीती अधिका - यांना होताच वनपाल राहुल तांबरे वनरक्षक कल्यानी पाल , एम . बि . नागोसे घटनास्थळ गाठुन जखमी गुराख्यास प्राथमीक आरोग्य केन्द्र पाथरी नेवुन उपचार करण्यात आला . गाई , बैल , शेळया नेहमीच या घटना या परीसरात होत असतात परंतु आज मनुष्यावरती हल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरलेली आहे