रोटरी क्लबच्या वतीने कोरोनाग्रस्तांनासाठी एक लाखाचा निधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०२०

रोटरी क्लबच्या वतीने कोरोनाग्रस्तांनासाठी एक लाखाचा निधीनागपूर :- कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी शासन, प्रशासन व नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत. या लढ्यात अनेक सेवाभावी संस्था आपापल्या परीने योगदान देत आहेत. रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ तर्फे अध्यक्ष कमलेश चोटवाणी व सचिव ज्योतिका कपूर यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी रोटरी क्लबच्या विदर्भ रिलीफ फंडातून देण्यात आला. मधु रुघवणी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश विभागीय डॉ. संजीवकुमार यांना सुपूर्द केला आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.