अहो यांना सांभाळा? कोरोना केअर सेंटर गावाबाहेर हलविण्याची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०२०

अहो यांना सांभाळा? कोरोना केअर सेंटर गावाबाहेर हलविण्याची मागणी

 


 

संजीव बडोले                                            जिल्हाप्रतिनिधी, नवेगावबांध                                              नवेगावबांध दि.17ऑगस्ट:-                         येथील येथील भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेला covid-19 कोरोना केअर सेंटर गावाच्या बाहेर इतरत्र हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, ग्रामपंचायत नवेगावबांध यांना दिले आहे.               हे विद्यालय गावाच्या मध्यभागी असून आजूबाजूला लोकवस्ती आहे. या विद्यालयाला लागूनच रहदारीचा रस्तादेखील आहे. या कोरोना केअर सेंटर मध्ये तालुक्यातील कोरोना संशयितांना क्वारनंटाईन करण्यासाठी ठेवले जाते. त्यातील काही रुग्ण  कोरोना  पाझीटिव्हही असतात. हे संशयित रुग्ण गावात इतरत्र फिरत असतात. त्यामुळे यातील एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह जर असला तर त्यापासून गावातील नागरिकांनाही संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोना केअर सेंटर मध्ये असलेल्या संशयितांवर देखरेख ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. हे संशयित कधी चहा टपरीवर, पानठेल्यावर तर कधी दारूच्या दुकानावर फिरतांना दिसत असतात. अशा गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. असे असताना त्यांच्या संपर्कामुळे स्थानिक नागरिकांना कोरोनाव्हायरस ची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हे कोरोना केअर सेंटर गावाच्या बाहेर इतरत्र हलविण्यात यावे. अशी मागणी या कोरोना केअरकेंद्राच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन दिनांक 13 ऑगस्टला रोज गुरुवारला उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना गावकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रेवचंद शहारे, दिलीप पोवळे यांनी हे निवेदन दिले.