लॉकडाउनच्या काळात चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

लॉकडाउनच्या काळात चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती


चंद्रपूर दि. २७ (प्रतिनिधी ) :
लॉकडाउनच्या काळात दोन बालचित्रकार चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती करत आहेत.संकल्प आणि कुशल मशारकर अशी या दोन भावांची नावे आहेत. ते। चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेत इयत्ता 4 थी तर ukg च्या वर्गात शिकत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करत घरबसल्या ही दोन भावंडे आपल्या चित्रातून वेगवेगळे संदेश देत आहेत. कोरोना माहामारीची चित्रांद्वारे कोरोना गंभीरता आणि लॉकडाउनचे महत्त्व नागरिकांच्या सहज लक्षात आणून देत आहेत. घरातच राहा,सुरक्षित राहा असा संदेशही त्यांनी आपल्या चित्रांतून दिला आहे.