आता उरले केवळ 447 बाधित;893 बाधितांना सुटी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑगस्ट २०२०

आता उरले केवळ 447 बाधित;893 बाधितांना सुटी

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 
बाधितांची संख्या पोहोचली 1354 वरØ  24 तासात 48 बाधितांची नोंद

Ø  शनिवारी आणखी एका बाधिताचा मृत्यू
चंद्रपूरदि. 22 ऑगस्ट: जिल्ह्यात 24 तासात 48 बाधित पुढे आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1354 वर पोहोचली आहे. यापैकी सध्या 447 बाधितांवर उपचार सुरू आहे. तर 893 बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने अँन्टीजेन चाचणी सुरू असून लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गणपती वार्डबल्लारपूर येथील 79 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. बाधिताला 20 ऑगस्टला दुपारी 12.35 वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दिनांक 21 ऑगस्टच्या रात्री एक वाजता अर्थात 22 ऑगस्टच्या पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तर तेलंगाणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आज चंद्रपूर शहरात सर्वाधिक 19 बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबरबल्लारपूर येथील 5, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोनकोरपना येथील 8, चिमूरसिंदेवाहीजिवतीब्रह्मपुरीमुल येथील प्रत्येकी एकगोंडपिपरी येथील 5 बाधित ठरले आहे. असे एकूण 48 बाधित पुढे आले आहे.
चंद्रपूर शहरातील पुढे आलेल्या बाधितांमध्ये बाबुपेठ परिसरातील एकसरकार नगर येथील एकओम नगर भिवापूर वार्ड येथील एकबाजार वार्ड येथील एकरामनगर येथील एकबाबुपेठ वार्ड पाण्याच्या टाकीजवळील परिसरातील एकसंजय नगर येथील एकश्रीराम वार्ड रामाळा तलाव जवळील एकतुकूम येथील चारसुमठाणा रोड परिसरातील एकविवेकानंद नगर वडगाव रोड येथील एकअर्चना अपार्टमेंट परिसरातील मुल रोड चंद्रपूर येथील एकमेजर गेट येथील एक बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली व घुग्घुस येथील प्रत्येकी एक बाधित ठरले आहेत.
बल्लारपूर येथील फुलसिंग वार्डश्रीराम वार्डगुलमोहर पार्कमौलाना आझाद वार्ड परिसरातील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सास्ती व टेंभुरवाही येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.
कोरपना तालुक्यातील कोथोडा येथील एक तर खैरगाव येथील 7 बाधित ठरले आहेत.भद्रावती येथील एक तर तालुक्यातील माजरी येथील एक बाधित पुढे आलेला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील 5 बाधित ठरले आहेत.