मनपा रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटरद्वारे 4090 अँटीजन चाचण्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ ऑगस्ट २०२०

मनपा रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटरद्वारे 4090 अँटीजन चाचण्या


चंद्रपूर २५ ऑगस्ट - चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे सुरु करण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टींग सेंटरद्वारे १०० ते १५० टेस्ट दररोज घेतल्या जात असून आतापर्यंत ४०९० अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी,कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळण्याकरीता चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे स्वत:चे कोविड १९ अँटीजन टेस्टींग सेंटर जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे सुरु करण्यात आले आहे.
१५ जुलैपासुन सुरु करण्यात आलेल्या या टेस्टींग सेंटरमधे दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा मिळत आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी झाला असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत मिळत आहे. रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोवीड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होत आहे.
या सेंटरमधे करण्यात येणाऱ्या चाचण्या या इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रीसर्चच्या दिशा निर्देशानुसारच करण्यात येतात. कोविड सदृश्य लक्षणे ताप, सर्दी, थकवा, खोकला असलेल्या व्यक्ती, कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातील रुग्ण, रुग्णालयाच्या संशयीत कक्षातील रुग्ण यांची विशेषतः तपासणी येथे करण्यात येते.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटर येथील नोडल अधिकारी म्हणुन डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी आहे. सहायक म्हणुन मेडीकल ऑफिसर डॉ. जयश्री वाडे, डॉ. सुवर्णा रामपेल्लीवार तसेच विद्या चौधरी, स्नेहल शंभरकर, अनिता बंडेलवार, स्मिता उराडे, बालाजी जाधव, शुभम दिवसे, राकेश सोयाम व प्रलय पडगलेवार अशी मनपा टीम येथे सातत्याने कार्यरत आहे.