स्मार्ट गर्ल्स विषयावर नेहरू विद्यालय येथे ऑनलाइन वेबिनार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

स्मार्ट गर्ल्स विषयावर नेहरू विद्यालय येथे ऑनलाइन वेबिनार

स्मार्ट गर्ल्स विषयावर नेहरू विद्यालय येथे ऑनलाइन वेबिनार .
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )

हिंगणा येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय जैन संघटना यांच्यावतीने स्मार्ट गर्ल या विषयावर ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालय पूर्णपणे बंद आहेत अशा वेळेस वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल असे मार्गदर्शन मिळावे या हेतूने संचालिका अरुणा महेश बंग यांच्या संकल्पनेतून या वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.
त्यात प्रामुख्याने किशोरवयीन मुलींसाठी आत्मरक्षा आणि आत्मसम्मान,स्वत: ला ओळखा व सक्षम बना,किशोरवयिन मुलींच्या समस्या व समाधान,आजच्या युगातील मुलींसाठी नविन आव्हाने अशाप्रकारच्या विविध व आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शक किरण मुंदडा, व कल्पना मोहता यांनी सखोल मार्गदर्शन केले. वेबिनार ला नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यशस्वितेकरिता मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, शिक्षिका खोलकुटे मॅडम व काळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.