सोयाबीन पिकावर आलेल्या रोगाची पाहणी करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

सोयाबीन पिकावर आलेल्या रोगाची पाहणी करा

हिंगणा तालुक्यातील सोयाबीन पिकावर आलेल्या रोगाची पाहणी करा
भाजपा हिंगणाचे तहसीलदारांना निवेदन
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या अनभिज्ञ अशा पिवळया रोगांमुळे सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . पीकावर आलेल्या रोगाची सत्यपरीस्थिती शासनाच्या निदर्शनात आणून देण्याकरीता हिंगणा विधानसभेचे आमदार श्री समीर मेघे यांच्या मार्गदर्शनात पुढाकाराने भारतीय जनता पार्टी हिंगणा व डिगडोह मंडळाचे अध्यक्ष श्री धनराजजी आष्ट्णकर व श्री .सुरेशजी काळबांडे यांच्या नेतृत्वात हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने सोयाबीन पिकांच्या नुकसानीची तातडीने चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीचे निवेदन हिंगणाचे तहसीलदार संतोषजी खांडरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विशाल भोसले, वानाडोंगरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ.वर्षाताई शहाकार, विकास दाभेकर, देवेन्द्र आष्ट्णकर, कैलास गिरी, सतिशजी शहाकार, प्रविण घवघवे, भक्तराज भोयर, दादाराव मसराम, नलुबाई आवारी, अनिताताई गुप्ता, छायाताई कऱ्हाडकर, गीताताई ठाकरे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.