कोरोना योद्ध्यांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

कोरोना योद्ध्यांचा सत्कार


गडचिरोली, ता 27 : मागील सहा महिन्यांपासून देशात सर्वत्र कोरोना विषाणुने हाहाकार माजविला आहे. त्याचा दूरवर परिणाम दिसून येत आहे. शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब-याच उपाययोजना करुन टाळेंबदीची घोषणा केली. या कठीण परिस्थितीत नगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्वाची होती. या कामात विशेष योगदान दिलेल्या नपच्या मुख्य 4 कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे प्रशस्तीपत्र देवून मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत बाहेरुन आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करणे, शहरात व कोविड सेंटरची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी महत्वाची कामे नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी केले. या कामात विशेष योगदान देणा-या 4 कर्मचा-यांचा जिल्हा वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिका-यांचे प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे शरद सोनटक्के, अग्निशमन विभागाचे फायरमन केशव सातपुते, आरोग्य विभागाचे सीटी कॉर्डीनेटर तृप्ती मल, राजेश मधुमटके यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, गणेश नाईक व इतर कर्मचारी उपस्थित होते.