गजानन महाराज मंदीरात सॅनिटायझर मशीन भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० ऑगस्ट २०२०

गजानन महाराज मंदीरात सॅनिटायझर मशीन भेट

गजानन महाराज मंदीरात सॅनिटायझर मशीन भेट
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
येथील दत्तवाडीतील पल्लवी पंचकर्म आणि आयुर्वेद हास्पीटलच्या संचालिका डॉ. पल्लवी सतीश राणे यांनी गजानन सोसायटी मधील श्री संत  गजानन महाराज मंदिरात सॅनिटाइजर मशीन  भेट दिली .परिसरात प्रसिद्ध असलेल्या गजानन मंदीरात श्री संत गजानन महाराज ,श्री राम सीता ,श्री हनुमान ,श्री विठ्ठल रूख्मीनी ,संत तुकाराम ,संताजी महाराज ,महादेव पिंड अशा आकर्षक मुर्त्या असुन विस्तीर्ण जागेत मंदीर असल्यामुळे मोठया प्रमाणात धार्मीक कार्यक्रम सुरू राहतात त्यामुळे  येथे भावीकाची गर्दी राहतात . त्यामुळे  कोरोना संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन येथे  सर्वांनाच उपयुक्त ठरेल अशी सॅनिटायझर मशीन लावण्यात आली आहे .ही मशिन सुरक्षेसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरत असल्याचे सतिश राणे यांनी सांगीतले. यावेळी डॉ. पल्लवी राणे , सतीश राणे, अॅड .श्रीराम बाटवे ,राजेंद्र तिवारी ,मानसिंग ठाकूर , निवृत्ती पवार ,मुकुंद रंगदळे ,अभिजीत जोशी ,व्ही. जी .मुदलीयार ,आशीष भट्टलवार ,तेजराज निघोट ,पार्थ भट्टलवार उपस्थित होते .