गणपती बाप्पा विराजमान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०२०

गणपती बाप्पा विराजमान

गणपती बाप्पा विराजमान
श्री गणेश मित्र मंडळ वाडीचा आकर्षक गणपती
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
महाराष्ट्राचे लाडके आणि आराध्य दैवत गणरायाचे आगमन वाडी परिसरात घरोघरी व कॉलनीत मोठया उत्साहात व आनंदात झाले .
दहा दिवस परिसरात सर्वत्र चैतन्य आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे . यंदा कोरोनाचे सावट असून देखील नियमांचे पालन करीत एक वेगळाच जोश आणि भक्तीमय वातावरण दिसून येत आहे .
कोरोनाचे संकट असल्याने यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करणार असल्याचे श्री गणेश मित्र मंडळ खडगाव रोड , वाडीचे मंडळ सल्लागार अमोल भोयर यांनी सांगीतले .
श्री गणेश काॅलनी खडगाव रोड वाडी येथील श्री गणेश मंडळातर्फे या वर्षी आकर्षक गणेश मुर्ती बसविली आहे . मंडळाचे सल्लागार अमोल भोयर , मंडळ आयोजक ,शुभम तिडके,मंडळ अध्यक्ष नयन पाऊलझरे,रोहित राऊत, आकाश भोयर ,पियुश भडांगे,भुषण भडांगे,राधे मेहर, आशिष शाह,अभिषेक शाह, राहूल हलामी, सचिन तिवारी आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यरत आहे .