चंद्रपुरात पब्जी ने घेतला युवकाचा जीव:पब्जी गेमची लेव्हल पूर्ण करून न शकल्याने युवकाने केली आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑगस्ट २०२०

चंद्रपुरात पब्जी ने घेतला युवकाचा जीव:पब्जी गेमची लेव्हल पूर्ण करून न शकल्याने युवकाने केली आत्महत्या

चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपुरात पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ तर पब्जी प्रेमीनी धसका घेतला आहे.
गौरव पाटेकर वय 19 वर्षे असे तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या शहरातील राहतो.गौरव हा नागपूर येथील रायसोनी कॉलेज येथे बी.कॉम.(प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला शिकत होता.लॉकडाऊनच्या काळात घरीच वास्तव्याला असल्याने त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे व्यसन जडले होते. 
याने पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने आत्महत्या केली आहे.कॉलेज नसल्यामुळे गौरवकडे भरपूर रिकामा वेळ होता. या रिकाम्या वेळात तो दिवस-रात्र मोबाईल मध्ये व्यस्त असायचा आणि पब्जी गेम खेळत असे. त्याच्या पालकांनी अनेक वेळा त्याला समजविण्याचा आणि यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गौरवच्या वागण्यात फरक पडला नाही.
खिडकीतून उजेड येत आहे त्यासाठी मी साडी नेत आहे म्हणून तो रूममध्ये साडी घेऊन गेला आणि त्याच साडीने त्याने गळफास घेतला. आत्महत्येआधी त्यानी आपल्या मित्राला फोन केला आणि मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले मित्राने त्याच्या भावाला फोन केला. त्याच्या भावाने रूममध्ये जाऊन बघितले तोपर्यंत उशीर झाला होता आणि गौरवचा मृत्यू झाला होता.