डिजिटल शैक्षणिक पाक्षिक "रयतेचा वाली" पहिला अंक प्रसिद्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

डिजिटल शैक्षणिक पाक्षिक "रयतेचा वाली" पहिला अंक प्रसिद्धनागपूर / अरूण कराळे (खबरबात)
राज्यभरातील उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांच्या यशोगाथा जास्तीत जास्त शिक्ष्क, विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली परिवाराने १ ऑगस्ट रोजी साहीत्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांचा स्मृतीदिन निमीत्य महत्वाचे पाऊल उचलत सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मारोती वाघमारे यांच्या हस्ते मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक पाक्षिक रयतेचा वालीचा पहिला अंक प्रसिद्ध प्रसिद्ध केला आहे.
हे पाक्षिक दैनिक रयतेचा वालीचे संपादक शाहू संभाजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आले असून या पाक्षिकाच्या कार्यकारी संपादक सुनिता इंगळे या आहेत. पक्षिकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि आतील रचना अत्यंत आकर्षक बनविली असून त्यातील सर्वच यशोगाथा दर्जेदार आहेत. शिक्षकांच्या कार्याला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्यभरातील जिल्हा प्रतिनिधी झुमद्वारे सहभागी झाले होते.या पाक्षिकात राज्यातील ३२ शाळेच्या व १० शिक्षकांच्या यशोगाथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.