नागपूर तालुक्यातील ग्रा.पं. मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०२०

नागपूर तालुक्यातील ग्रा.पं. मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

नागपूर तालुक्यातील ग्रा.पं. मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर तालुक्यातील पिपळा (घोगली) ,सुराबर्डी,येरला, फेटरी ,दवलामेटी,खडगाव , लाव्हा ,द्रुगधामना येथे ७४ वा भारतीय स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला
पिपळा ( घोगली ) ग्रामपंचायत मध्ये सरपंच नरेश भोयर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य वैशालीताई भोयर ,उपसरपंच प्रभूजी भेंडे,ग्रा.पं.सदस्य प्रकाश भोयर, ग्रा. पं. सदस्य वनिताताई कावळे,वैशालीताई पांडे,शकुनबाई वाघ ,ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपुरे,मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सुराबर्डी ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.भावनाताई तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रा. पं. सचिव मनिष रावत ,उपसरपंच सौ.वनितातााई कापसे ,ग्रा. पं. सदस्य सौ.वनिताताई गणवीर, सौ.नेहाताई कोकण ,सतिश नेवारे, ग्रा. पं . कर्मचारी शेषराव कोहळे ,राजु बागडे ,दिलीप ठाकरे ,दिपक राऊत ,प्रमोद पाटील, वर्षाताई मोहरले उपस्थित होते.
येरला ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ. मायाताई ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपसरपंच प्रमोद गमे ,ग्रा. पं. सचिव राजू मुरोडीया ,सदस्य सौ. भारतीताई खोब्रागडे ,सौ.लताताई कुंभरे ,सौ.सोनालीताई बोडे ,सौ.सवीताताई ठाकूर ,सौ.वैशालीताई पेटकर ,राजेंद्र अखंड ,मंगेश तायवाडे उपस्थित होते .
फेटरी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आशीष गणोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रशांत पवार ,आरोग्य सेवक योगेंद्र चंदनखेडे ,मुख्याध्यापीका रहीसा कुरेशी ,आशा वर्कर अंगणवाडी सेवीका उपस्थित होते .
दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.आनंदीताई कपनीचोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे ,उपसरपंच गजानन रामेकर ,नितीन अडसड ,प्रशांत केवटे ,संजय कपनीचोर ,सतीश खोब्रागडे ,आरती ढोके ,रश्मीताई पाटील ,रागिनी चांदेकर ,हेमलता खैरकर ,प्रभाताई थोरात ,कल्पनाताई गवई उपस्थित होते .
लाव्हा ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.ज्योत्सना नितनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रामविकास अधिकारी विकास लाडे ,उपसरपंच महेश चोखांद्रे ,माजी पं. स. उपसभापती सुजित नितनवरे ,पांडुरंग बोरकर ,मनोज तभाने ,अनील पाटील,पुरुषोत्तम गोरे ,सुनंदा चोखांद्रे ,प्रशांत परिपवार ,मंजुषा लोखंडे ,साधना वानखडे ,सुलोचना डोंगरे ,सुनीता तडोसे ,रेखा पटले,सुशीला ढोक,सुनीता मेश्राम ,जया पीचकाटे उपस्थित होते .
खडगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.रेखाताई मुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य देवराव कडू , ग्रामविकास अधिकारी सुनील जोशी ,उपसरपंच किशोर सरोदे ,शितल उईके,सरला कडु, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणूका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे , मनोज कडु , चंद्रशेखर गणवीर, गोपाल ताकीत ,गणेश रहांगडाले ,दत्तुजी कडु, प्रशांत डोंगरे उपस्थित होते.
द्रुगधामना ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ. दुर्गा कीरणायके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपसरपंच सुधाकर राऊत, शंकर गजभिये, दशरथ इटकर, प्रियंका कुडमते, समिता बोरकर, विद्याताई राऊत,सरिता बोरकर,रवी चव्हाण, नरेश गजभिये, ताराचंद बोरकर, मोहन शेंदरे उपस्थित होते .