कोरोनाव्हायरस च्या संसर्गाच्या सावटाखाली प्रथमच स्वातंत्र्य दिवस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ ऑगस्ट २०२०

कोरोनाव्हायरस च्या संसर्गाच्या सावटाखाली प्रथमच स्वातंत्र्य दिवस

नवेगावबांध येथे 74 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

संजीव बडोले 
प्रतिनिधी नवेगावबांध
नवेगावबांध दि.15 ऑगस्ट:- येथे व परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा स्वातंत्र्य दिन कोरोनाव्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर राखत उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, स्वराज्य संस्था, सहकारी संस्था व विविध शासकीय कार्यालयात सामाजिक अंतर राखून उत्साहात साजरा करण्यात आला.
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या हस्ते पार पडले. बालाजी चौकातील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य अर्चना पंधरे यांच्या हस्ते, तर आझाद चौकातील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य अनुसया नैताम यांच्या हस्ते पार पडले. येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ कृषी अधिकारी कुमोदिनी बोरकर ,नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात उपविभागीय वनाधिकारी एस. एफ. बोराडे, वन आगार नवेगावबांध येथे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी  राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पात डॉ. ए.के. कापसे, लघु पाटबंधारे विभागात उप विभागीय अधिकारी समीर बनसोड, जिल्हा परिषद हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय डोये, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार यार्ड उपसभापती लायकराम भेंडारकर, जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य एम. एस. बलवीर, बीएडी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रूपचंद काशीवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अनिल दहिवले, सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ रेशीम काशीवार, उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डॉ. सूर्याजी संग्रामे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
उत्साहात संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनाला उपसरपंच रघुनाथ लांजेवार,  ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रितेश जायस्वाल, घनश्याम परसुरामकर, संजय ऊजवने,हरीचंद डोंगरे,सतीश कुंभरे,शितल राऊत,गुणिताबाई डोंगरवार,दुर्गा मेश्राम, लताबाई आगाशे,हर्षा बाळबुध्दे,लिलाबाई सांगोळकर,सरीता बडोले, रेशीम काशीवार, ओमप्रकाश काशीवार तसेच तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर,नवल चांडक,शैलेश जायस्वाल उद्योगपती नितीन पुगलिया,मुलचंद गुप्ता, अंगणवाडी सेविका आशा जुगादे,आशा सेविका प्रदिपा बडोले, वर्षा तिमांडे,माया नागपुरे आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका योगिता टेंभुर्णे,कुंदा पंचभाई, ललिता बावनकर ,मांढरे आरोग्य सेविका, प्रमोद भिमटे आरोग्य सेवक,क्रुषी सहाय्यक मोहतुरे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन सांगोळकर,अशोक परशुरामकर,  संदिप शहारे,छगन बलोदे,संदिप राऊत,पंकज जांभूळकर,विलिन बडोले, उत्साहात संपन्न झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या या उत्सवात गावातील सर्वपक्षीय नेते तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते. मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक अंतर राखल्या गेले.