आकापूर, करोलीच्या पूरबाधितांना पोलिसांनी केली मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०२०

आकापूर, करोलीच्या पूरबाधितांना पोलिसांनी केली मदत
पाथरी पोलिस ठरले निराधारांना आधार

पाथरी/ प्रतिनिधी
दि . 31/08/2020 रोजी मौजा करोली, आकापुर येथील गावाला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने विळखा बसलेला असुन, पुराचे पाणी गावातील घरात घुसलेले आहे. त्यामुळे ठाणेदार योगेश घारे यांनी संबंधीत प्रशासनाशी संपर्क करून , एकुण तेरा कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन पाथरी तर्फे सदर कुटुंबियातील सदस्यांना फुड पॉकेटस , बिस्कीट , पाणी तथा मेडीसीन यांची व्यवस्था स्वखर्चाने घरपोच करण्यात आली . गावातील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करीत असुन , त्यांची जनावरे तसेच ईतर घरगुती साहीत्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे . दोन्ही गावात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन , स्वता ठाणेदार योगेश घारे जातीने लक्ष देत असुन , कोणत्याही प्रकारची जिवीतहानी तसेच वित्तहानी होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत . वैनगंगा नदीने पोलीस स्टेशन पाथरी हददीतील आकापुर , करोली , निमगाव , दाबगाव मौशी परीसरात थैमान घातले असुन , सदर परिसर जलमय झाले आहे . मौजा करोली येथील अरूण मारूती मोहुर्ले यांचे पुराचे पाण्याने घर पडलेले असुन , त्यांचे घरात पाणी घुसले, अशा कठीण प्रसंगी ठाणेदार व त्यांचे पोलीस पथक यांनी तात्काळ त्यांचे कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढुन, त्यांचे घरगुती सामान सुध्दा पाण्यातुन बाहेर काढले. अशा कठिण प्रसंगात ठाणेदार योगेश घारे यांनी कोणतीही जिवीतहानी होणार नाही याकडे लक्ष ठेवुन , त्यांना जिवनोपयोगी साहीत्य पुरवुन , निराधारांना आधार दिला आहे . करीता पोलीस स्टेशन पाथरी चे सर्व नागरिकांनी आभार मानले आहे .