अबब! मॉर्निंग वॉकला जाणे बेतले जिवावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०२०

अबब! मॉर्निंग वॉकला जाणे बेतले जिवावर
मारेगाव येथील घटना

सतीश बालबुधे
यवतमाळ : मारेगाव येथील तरुण मॉर्निंग वॉकला जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना मारेगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगरुळजवळ रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. राकेश ढुमणे वय २९ वर्ष असे मृतक तरूणाचे नाव असून या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण झाले आहे.
मारेगाव ते मांगरूळ या दोन किमी असलेल्या हायवेवर रविवारी सकाळी राकेश ढुमणे हा मार्निंग वॉकसाठी निघाला होता. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने राकेशला जोरदार धडक दिली. या धडकेत राकेशचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कुटुंबीयांनी धाव घेतली.

दीड वर्षापूर्वी भावाचाही अपघाती मृत्यू
सन २०१८ मध्ये राकेश ढुमणे याच्या मोठा भावाचा गौराळा गावाजवळ अपघाती मृत्यु झाला होता. दिड वर्षाच्या अंतरात राकेश यांच्या मृत्युने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राकेशच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा असा परिवार आहे.