महावितरण उप केंद्र सहाय्यक(२००० जागा) आणि विद्युत सहाय्यकाच्या(५००० जागा) भरतीचा मार्ग मोकळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ ऑगस्ट २०२०

महावितरण उप केंद्र सहाय्यक(२००० जागा) आणि विद्युत सहाय्यकाच्या(५००० जागा) भरतीचा मार्ग मोकळा


नागपूर/प्रतिनिधी:
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज ४ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आदेश. 

यापूर्वी, २३ जूनला ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते मात्र कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्यास विलंब झाला. 

आता ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उप केंद्र सहाय्यकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण करणार त्यानंतर विद्युत सहाय्यक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

७००० जागांची भरती असल्याने सोशल डीस्टंसिंग आणि कोविड नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.