चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात स्वातंत्र्यदिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ ऑगस्ट २०२०

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात स्वातंत्र्यदिन साजरा

चंद्रपूर/खबरबात:
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष संजय तुमराम यांनी स्वातंत्र्यदिनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रशांत देवतळे, मोहन धनकर यांच्यासह माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य, नितीन बन्सोड, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, कोषाध्यक्ष जितेंद्र मशारकर, संघटन सचिव साईनाथ सोनटक्के, आशिष अम्बाडे, महेंद्र ठेमस्कर, प्रविण बल्की, बाळू रामटेके, देवानंद साखरकर, खुशाल हांडे, विशाल टोकेकर यांच्यासह माध्यमकर्मीं आणि पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.