लोकांच्या मनातले जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० ऑगस्ट २०२०

लोकांच्या मनातले जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

चंद्रपूर/खबरबात:
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटा, व चर्चा सुरू असतात चंद्रपुरात लोकांच्या मनातले जिल्हाधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची पुणे महापालिकेत बदली झाली आहे. 
मागील आठवड्यात राज्यभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या यात चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांची देखील बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर चंद्रपूरकरांमध्ये चांगलाच रोष बघायला मिळाला. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी चंद्रपुरात अनेक चांगले काम करत शांतता व सुव्यवस्था कायम ठेवली होती. 
त्यामुळे ते लोकांच्या मनात ठसा उमटवून गेले होते त्यानंतर कुणाल खेमणार यांची बदली कोणत्या ठिकाणी होते याची सर्वांना वाटत होती. शासनाने आता खेमनार यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी दिली आहे.
डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या बदलीने सोशल मीडियावर चांगलाच रोष निर्माण झाला होता.कोरोना काळात प्रशासकीय आणि आरोग्य वर्तुळातील उत्तम सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा असे नाव देत गौरविले जात आहे. त्यामळेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा कौतुक केलं.

सुरुवातीला हाफकिनचे एमडी म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळीच ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव – ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री – कोणी एक दोन नाहीत, तर अनेक… या मंत्रालयाचं ‘बजेट’ नाही… ‘टार्गेट’ असतं” अशी टीका त्यांनी केली होती.