चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी मंत्रालयात बुधवारी बैठक ; होऊ शकतो दारूबंदी बाबत निर्णय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी मंत्रालयात बुधवारी बैठक ; होऊ शकतो दारूबंदी बाबत निर्णय


नागपूर(खबरबात):
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे.येत्या २ सप्टेंबर रोजी मंत्रालयीन दालनामध्ये दारूबंदी बाबत बैठक लावण्याची विनंती पत्राद्वारे राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी असल्यामुळे अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यामध्ये अल्पवयीन मुलांमध्ये दारूची अवैध प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे.तसेच बनावट दारूमुळे मृत्यूमध्ये सुद्धा वाढ झाली आहे.


त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे निर्बंध उठवावे यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी मंत्रालयीन दालनामध्ये दारूबंदी बाबत बैठक लावण्याची विनंती पत्राद्वारे राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वडेट्टीवार यांनी केली आहे.