चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1027 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ ऑगस्ट २०२०

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1027


शुक्रवारी आणखी 39 कोरोना बाधित
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 409
609 बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूरदि. 14 ऑगस्ट: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1027 झाली आहे. तथापी, जिल्ह्यातील दुर्गापुरघुग्घुसबल्लारपूरनागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे दिसून आल्यास तात्काळ अँटीजेन तपासणी करून घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 39 बाधिताची नोंद झाली आहे.काल सायंकाळी 988 असणारी बाधितांची संख्या आज 1 हजार 27 वर पोहोचली आहे. यापैकी 609 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 409 बाधितावर उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 17चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील 5गडचांदूर येथील 2बल्लारपूर शहरातील 6पोंभूर्णागोंडपिपरीसावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एकराजुरा दोन तर वरोरा येथील तीन असे एकुण 39 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील पोलिस कॉर्टर तुकुम परिसरातील तीनसीटीपीएस रोड परिसरातील एककोंडी वार्ड नंबर 5 येथील दोनदडमल वार्ड सोमेश्वर मंदिर परिसरातील तीनजटपुरा गेट परिसरातील एकबालाजी वॉर्ड नंबर 2 येथील दोनवेटर्नरी वार्ड येथील दोनइंदिरानगर येथील एकचोर खिडकी येथील एकजगन्नाथ बाबा नगर परिसरातील एकपठाणपुरा परिसरातील एक बाधित पुढे आलेले आहेत.चंद्रपूर तालुक्यातील घुगुस येथील 5 बाधित पुढे आले आहेत.
गडचांदूर येथील दोन पॉझिटिव्ह ठरले आहे.विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोनगोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपूर शहरातील एक पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
पोंभुर्णा येथील एकगोंडपिपरी येथील एकब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील एक, सावली तालुक्यातील हिरापूर येथील एकराजुरा येथील कर्नल चौक परिसरातील एकआंबेडकर वार्ड राजुरा येथील एक बाधित पुढे आलेले आहेत. वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील एक तर वरोरा शहरातील दोन बाधित ठरले आहे.
अँन्टीजेन तपासणी विषयक माहिती:
जिल्ह्यात 18 हजार 391 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 207 पॉझिटिव्ह असून 17 हजार 184 निगेटिव्ह आहेत.
शहरात येथे असणार अँन्टीजेन चाचणी केंद्र :
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे अँटीजेन चाचणी केंद्र जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळापंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केलेले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध आहे.
तपासणीचा निकाल तात्काळ :
अँन्टीजेन चाचणी केंद्रांमध्ये दररोज 125 ते 200 चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ 15 ते 30 मिनिटाचा असतो. त्यामुळे निदान व उपचार करण्याची प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1027 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 20 बाधित6 ते 18 वर्ष वयोगटातील 75 बाधित19 ते 40 वर्षे वयोगटातील 602 बाधित41 ते 60 वर्षे वयोगटातील 242 बाधित61 वर्षावरील 58 बाधित आहेत. तसेच 1027 बाधितांपैकी 712 पुरुष तर 315 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
1027 बाधितांपैकी जिल्ह्यातील 924 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 61 आहे.
जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती:
जिल्ह्यात सध्या 83 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 124 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 124 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 431 आरोग्य पथकाद्वारे 18 हजार 782 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 75 हजार 152 आहे.
जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 871 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 91 नागरिकतालुकास्तरावर 362 नागरिक तरजिल्हास्तरावर 418 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 92 हजार 811 नागरिक दाखल झाले आहेत. 91 हजार 108 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 703 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.