चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 944; कोरोनामुळे सहावा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ ऑगस्ट २०२०

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 944; कोरोनामुळे सहावा मृत्यू


कोरोनामुळे जिल्ह्यातील सहावा मृत्यू
561 कोरोनातून बरे ; 375 वर उपचार सुरू
24 तासात 46 बाधितांची नोंद
चंद्रपूर,दि. 12 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 944 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 561 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 375 बाधितांवर उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 898 बाधितांची संख्या होती. आज सायंकाळपर्यंत 944 वर पोहोचली आहे. घुग्घुस येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा काल मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे.
आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहरातील  पोलीस लाईन परिसरातील एकहनुमान मंदिर जवळील एकलालपेठ कॉलरी परिसरातील एकसुभाष नगर डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील दोनविवेकानंद वार्ड येथील चारन्यू कॉलनी परिसरातील एकडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील एकवृंदावन परिसरातील एकरामनगर येथील दोनगुरुद्वारा परिसरातील एकरीद्धी अपार्टमेंट परिसरातील एक असे चंद्रपूर शहरातील 16 बाधितांचा समावेश आहे.
लक्कडकोट तालुका राजुरा,जम्मुकांता तेलंगणागोंडपिपरीभद्रावती येथील प्रत्येकी एका बाधितांचा समावेश आहे.गोकुळ नगर वार्ड बल्लारपूर येथील दोनहिरापूर तालुका सावली येथील तीन बाधितांचा समावेश आहे.
वरोरा मालवीय वार्ड एक व कर्मवीर वार्ड एक असे एकूण दोन बाधित पुढे आलेले आहेत. ब्रह्मपुरी रेल्वे कॉर्टर एकसुंदर नगर दोनतीलक नगर एक व मांगली येथील दोन असे एकूण सहा बाधितांचा समावेश आहे.
मिंथुर तालुका नागभीड येथील एकमोहाडी येथील दोनपळसगांव येथील तीनपार्डी ठावरी येथील एकमसाळी येथील एककोडेपार येथील एक, कन्हाळगांव येथील एक, नागभीड शहरातील तीन बाधित असे नागभिड येथील 13 बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 15 हजार 775 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 169 पॉझिटिव्ह असून 15 हजार 606 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 92 हजार 222 नागरिक  दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 998 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 384 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 944 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 18 बाधित6 ते 18 वर्ष वयोगटातील 67 बाधित19 ते 40 वर्षे वयोगटातील 573 बाधित41 ते 60 वर्षे वयोगटातील 236 बाधित61 वर्षावरील 50 बाधित आहेत. तसेच 944 बाधितांपैकी 661 पुरुष तर 283 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
 944 बाधितांपैकी जिल्ह्यातील 831 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 61 आहे.
जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती:
जिल्ह्यात सध्या 76 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 115 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 115 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 401 आरोग्य पथकाद्वारे 17 हजार 419 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 69 हजार 179 आहे.