यवतमाळ : दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०२०

यवतमाळ : दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह


 47 जणांना सुट्टी
यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात 94 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 47 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 94 जणांमध्ये 60 पुरुष व 34 महिला आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील 19 पुरूष व नऊ महिला, पुसद शहरातील 14 पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरूष, दारव्हा शहरातील एक पुरूष, वणी शहरातील चार पुरूष व 11 महिला, महागाव तालुक्यातील पाच पुरूष व एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरूष, दिग्रस शहरातील 10 पुरूष व पाच महिलांचा समावेष आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 592 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 196 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2714 झाली आहे. यापैकी 1850 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 66 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 173 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 130 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 42580 नमुने पाठविले असून यापैकी 41441 प्राप्त तर 1139 अप्राप्त आहेत. तसेच 38727 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.