गङचिरोलीत 8 रूग्ण कोरोनामुक्त; नवीन 23 कोरोना बाधित Gadchiroli Corona positive - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ ऑगस्ट २०२०

गङचिरोलीत 8 रूग्ण कोरोनामुक्त; नवीन 23 कोरोना बाधित Gadchiroli Corona positive
गडचिरोली: जिल्हयातील कोराना बाधित रूग्णांपैकी आज 8 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच नवीन 23 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये एसआरपीएफचे एकूण 18 जवान यामध्ये कोरची येथील 11 व एटापल्ली येथील 7 जवान कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर अहेरी येथील संस्थात्मक विलगीकरणातील 3, धानोरा येथील कोरोना कोविड सेंटरमधील 1 व जिल्हा सामान्य रूग्णालयातील 1 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 158 झाली. तर एकुण बाधित संख्या 667 झाली. आत्तापर्यंत एकूण 508 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हयात 19 हजार कोरोना चाचण्या पूर्ण

गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात कोरोना विषयक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज रोजी पर्यंत 19148 जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. याबाबत अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांनी दिलेल्या माहितीनूसार आरटीपीसीआर 12125, ट्रुनॅट 1032, एन्टीजीन 5991 तपासण्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 19148 तपासण्यांमध्ये 665 रूग्ण आढळून आले आहेत तर दोन जणांची तपासणी जिल्हयाबाहेर झाली होती. सद्या 87 संभावित रूग्णांच्या तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे असे त्यांनी कळविले आहे.