जिल्ह्यात 6 कोरोनामुक्त; तर नवीन12 बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

जिल्ह्यात 6 कोरोनामुक्त; तर नवीन12 बाधित




गडचिरोली (जिमाक) दि.25 ऑगस्ट: जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 6 जण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 1 स्थानिक, अहेरी येथील 3 व आरमोरीतील 1 जणांचा समावेश आहे. या प्रकारे 6 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.



नव्याने आज 12 बाधित :
नवीन 12 बाधितांमध्ये गडचिरोली येथील नागपूर प्रवास केलेले पोलीस विभागातील 4 व स्थानिक 2 जण नंदूरबार वरून आलेले. आरमोरी येथील 1 सांगली येथून आलेला, चुरमूरा येथील 1 आरोग्य सेविका व त्यांचा 1 कुटुंब सदस्य, चामोर्शी, भामरागड व कोरची येथील प्रत्येकी 1 स्थानिक अशा प्रकारे 12 नवीन कोरोना बाधित आढळून आले.
यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 110 झाली तर आत्तापर्यंत 817 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्हयातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या 928 झाली.