43 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर; एकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ ऑगस्ट २०२०

43 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात 97 जणांची कोरोनावर मात


यवतमाळ, दि. 23 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 97 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 43 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे.
मृत झालेली व्यक्ती (पुरुष / वय 62) पुसद येथील असून ते 20 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित मृतांचा आकडा एकूण 64 झाला आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 22 पुरुष आणि 21 महिला आहेत. यात दारव्हा शहरातील दोन पुरुष, यवतमाळ शहराच्या विविध भागातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील सात पुरुष व चार महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक महिला, पुसद शहराच्या विविध भागातील चार पुरुष व दोन महिला, आर्णि शहराच्या विविध भागातील दोन पुरुष, वणी शहराच्या विविध भागातील एक पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील चार महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व तीन महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 546 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 197 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2620 झाली आहे. यापैकी 1803 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 64 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 168 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 174 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 42138 नमुने पाठविले असून यापैकी 40875 प्राप्त तर 1263 अप्राप्त आहेत. तसेच 38255 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००