२४ तासात तब्बल 270 बाधित; जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

२४ तासात तब्बल 270 बाधित; जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू


चंद्रपूर : नवेगाव (ता. मूल) येथील ७६ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात तब्बल 270 कोरोनाबाधित आढळले.


कोरोना पॉझिटिव्ह : 2344
बरे झालेले : 1224
ऍक्टिव्ह रुग्ण : 1094
मृत्यू : 26 (चंद्रपूर 23)

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये जिल्हा कारागृहातील एक अधिकारी व 71 कैदी बाधित ठरले असून चंद्रपूर शहर व परिसरातील 166 बाधितांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुल 9, चिमूर 1, नागभीड 21, राजुरा 8, वरोरा 13, भद्रावती 2, सावली 5, ब्रह्मपुरी 24, बल्लारपूर 5, कोरपना 14, गोंडपिपरी 2 बाधित पुढे आले अाहेत. असे एकूण 270 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.चंद्रपूर शहरातील जिल्हा कारागृहातील सर्वाधिक पॉझिटिव्ह ठरले असून साई बाबा वार्ड, तुकुम, नगीना बाग, बंगाली कॅम्प, भानापेठ, समाधी वार्ड, सिस्टर कॉलनी, पठाणपुरा, जुने तलाठी कार्यालय परिसर, संत रवीदास चौक, जटपुरा गेट परिसर, कोतवाली वार्ड, सिव्हिल लाईन, जीएमसी परिसर, अंचलेश्वर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, घुटकाळा वार्ड, रयतवारी तसेच तालुक्यातील दुर्गापुर, पडोली, ऊर्जानगर भागातून बाधित पुढे आले आहेत.मूल येथील पंचशील चौक तर तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा तालुक्यातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तळोदी बाळापुर येथील बाधित ठरले आहेत. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसर, इंदिरानगर, चुनाभट्टी परिसरातून बाधित आढळून आले आहे.वरोरा येथील अभ्यंकर वार्ड येथील बाधित ठरले आहेत.
https://youtu.be/RaA4naAvnfk
भद्रावती तालुक्यातील पाटाळा, गौराळा भागातून बाधित पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.ब्रह्मपुरी येथील संत रवीदास चौक, गुजरी वार्ड,हनुमान नगर तर तालुक्यातील बोरगाव, उदापूर, चिंचोली, मेंडकी, जुगनाळा परिसरातून बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील रेल्वे नगर वार्ड, गोकुळ नगर, महाराणा प्रताप वार्ड भागातून बाधित ठरले आहेत.कोरपणा तालुक्यातील वनसडी, गडचांदूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरी, आर्वी गावातून बाधित ठरले आहेत.