15 आँगस्ट पुर्वी संचारबंदी उठवा अन्यथा उग्र आंदोलन करणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ ऑगस्ट २०२०

15 आँगस्ट पुर्वी संचारबंदी उठवा अन्यथा उग्र आंदोलन करणार

नागपुरातील व्यापाऱ्यांनो समोर येऊन दुकाने हाँटेल सुरु करा
अॅड बाळासाहेब आंबेडकर
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
केंद्र व राज्य शासनाने मागील चार महिन्यापासून लावलेली संचारबंदी आता उठविण्याची आवश्यकता आहे.मृत्युचे प्रमाण शेकडा २ आहे . त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आता पुर्वीसारखे दैनंदिन व्यवहार सुरु करु द्यावे विनाकारण संचारबंदी लावून सर्व सामान्यांना मृत्यूच्या खाईत ओढवू नका. १५ ऑगस्ट पुर्वी जर हे संचारबंदी हटविली नाही तर संपुर्ण राज्यभर शासनविरोधात उग्र आंदोलन सुरू करणार असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे झालेल्या डफली आंदोलनात दिला आहे .
नागपुर येथील मोरभवन(बर्डी) बस स्थानकांपुढे आज शेकडोच्या संख्येने सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात डफली घेऊन राज्य व केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड .बाळासाहेब आंबेडकर यांचे या आंदोलन स्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी बँड व डफलीच्या गजरात सरकारविरोधात गजर केला. स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी हातात डफली घेऊन वाजविली. यावेळी बोलताना अॅड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना मध्ये आता सुधारणा करण्याची गरज आहे. कोरोना विरोधात लढण्याची ८० टक्के जनतेची तयारी आहे. यापैकी ९५ टक्के नागरिक उपचार घेऊन घरी परत येत आहेत. एकीकडे परप्रांतात जाण्यासाठी ट्रेन, बसेस सुरु आहेत पण राज्यात जिल्हाबंदी आहे हे विचित्र आहे. खाजगी बससेवा, वाहन सेवा सरकारने सुरु केली आहे. मात्र यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. ८०० रुपये भाड्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च खाजगी वाहन चालक आकारत आहेत. हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरु करावी.
नागपुरातील दुकानदार, व्यावसायिक, आँटोरिक्शा वाले यांना मी भरोसा द्यायला आलो आहे. तुम्ही सर्व दुकानदार समोर या आणि आपापले दुकाने सुरु करा. मी आपणास राजकीय व कायदेशीर संरक्षण देईल. तुम्हाला कोणी हात लावणार नाही याची मी ग्वाही देतो.सरकारने राज्यातील बेस्ट सेवा, एस टी महामंडळाच्या बसेस तसेच स्टार बसेस लवकरात लवकर सुरू कराव्यात. असेही अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगीतले .
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक राजुभाऊ लोखंडे, नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे, डॉ. रमेश गजबे(पुर्व विदर्भ समन्वय समिती अध्यक्ष), इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, शंकर बुरबुरे, माजी तहसीलदार धर्मेश फुसाटे, संजय हेडाऊ, नागपुर महिला शहर अध्यक्ष वनमालाताई ऊके, मायाताई शेंडे, नालंदा गणवीर, नंदिनी सोनी, सुजाता सुरडकर, नागपुर जिल्हा सल्लागार राजेश जंगले ,नागपूर जिल्हाध्यक्ष नितेश जंगले ,ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर,महासचिव अजय सहारे, सुमेध गोंडाणे (प्रवक्ता नागपुर जिल्हा ग्रामीण), आनंद चवरे, बबनराव वानकर, अंकुश मोहिले, सुनील इंगळे, अविराज थुल, पं. स. सदस्य सुधीर करंजीकर(दवलामेटी), भरत लांडगे, उमेश बेंडेकर, सुमेधु गेडाम (पुर्व नागपुर), कमलेश सहारे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.