गङचिरोली जिल्हयात 15 कोरोनामुक्त तर नवीन 6 बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑगस्ट २०२०

गङचिरोली जिल्हयात 15 कोरोनामुक्त तर नवीन 6 बाधित

गडचिरोली ता. .21 : जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 15 जण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 6 स्थानिक, अहेरी येथील 5 स्थानिक, भामरागड येथील 1, वडसा येथील 2 स्थानिक, धानोरा 1 व कोरचीतील 1 जणांचा समावेश आहे. या प्रकारे 15 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.


नव्याने आज 6 बाधित : 
नवीन 6 बाधितांमध्ये धानोरा येथील 1, चामोर्शी तालुक्यातील एकूण 4, यामध्ये यवतमाळ प्रवाशी 2, रूग्णालयातील भरती 1 रूग्ण व 1 जण तेलंगणावरून आलेला बाधित मिळाले. तर 1 जण ग्यारापत्ती येथील रूग्णाच्या संपर्कातील पोलीस जवान कोरोना बाधित आढळून आला.
यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 116 झाली तर आत्तापर्यंत 755 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्हयातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या 872 झाली.