121 नवीन पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

121 नवीन पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

यवतमाळ ‼ कोरोना BREAKING*‼


जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 78 पुरुष व 43 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 25 पुरुष व 22 महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील 17 पुरुष व तीन महिला, कळंब शहरात 10 पुरुष व आठ महिला, बाभुळगावमध्ये दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यात एक पुरुष व एक महिला, पुसद शहरात दोन पुरुष व पुसद तालुक्यात एक पुरुष, पांढरकवडा शहरात एक महिला, दारव्हा शहरात एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 497 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 245 जण आहेत.


_______________________________