जिल्ह्यात नव्याने 110 पॉझिटीव्ह; आणखी दोघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ ऑगस्ट २०२०

जिल्ह्यात नव्याने 110 पॉझिटीव्ह; आणखी दोघांचा मृत्यू


यवतमाळ दोघांचा मृत्यू; 31 जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात गत 24 तासात 110 नवीन पॉझेटिव्ह रुग्ण्ाद आढळले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे. 43 वर्षीय पुरुष हा 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला ताप व सर्दी होती. आज दुपारी त्याचा मृत्यु झाला. तर यवतमाळ शहरातील 44 वर्षीय महिला 21 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. तिला आठ दिवसांपासून खोकला होता. तसेच तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे 24 ऑगस्टच्या रात्री तिचा मृत्यु झाला.
24 तासात जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 110 जणांमध्ये 69 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात यात महागाव तालुक्यातील पाचपुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील 27 पुरुष व 12 महिला, वणी शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील सात पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, पुसद शहरातील आठ पुरुष व आठ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील 10 पुरुष व सात महिला तसेच इतर ठिकाणच्या एका महिलेचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 663 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 212 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2824 झाली आहे. यापैकी 1881 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 68 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 181 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी179 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 43873 नमुने पाठविले असून यापैकी 42634 प्राप्त तर 1239 अप्राप्त आहेत. तसेच 39810 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.