नवेगावबांध येथे जनता कर्फ्यू 100% यशस्वी; बाजारपेठा पूर्णतः बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ ऑगस्ट २०२०

नवेगावबांध येथे जनता कर्फ्यू 100% यशस्वी; बाजारपेठा पूर्णतः बंद

10 नागरिकांवर दंडात्मक कारवाई.                                                                               संजीव बडोले                                      प्रतिनिधी, नवेगावबांध.
 नवेगावबांध दि.13 ऑगस्ट:-येथील पोलिस ठाण्यात तील  एका अधिकाऱ्यासह तेरा पोलीस शिपाई कोरोना बाधित आढळल्यामुळे या पार्श्वभूमीवर नवेगावबांध येथे 12 ऑगस्ट  च्या  सायंकाळी सात वाजेपासून ते 16 ऑगस्ट पर्यंत चार दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.गावातील नागरिकांनी जनता कर्फ्यू ला शंभर टक्के प्रतिसाद दिला, गावातील सर्व बाजारपेठात कडकडीत बंद पाळण्यात आला. 11 ऑगस्ट रोजी नवेगाव बांध ग्रामपंचायतच्या  दक्षता समितीच्या बैठकीत जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला होता.  या जनता कर्फ्यू ला नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले होते.
येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एका पोलीस अधिकार्‍यासह तेरा पोलीसांना कोरोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  येथील पोलिस स्टेशन मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 एवढी आहे.
  नवेगावबांध येथे या पार्श्वभूमीवर 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोज रविवार पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.  नागरिकांना किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी 12 ऑगस्टला वेळ देण्यात आली होती. त्यानंतर आज 13 ऑगस्ट ला सकाळ पासूनच सर्व बाजारपेठा बंद होत्या. बसस्थानक, आझाद चौक, बालाजी चौक, टी पॉईंट चौक, दुर्गा मंदिर चौकातील सर्व दुकाने व  आस्थापने बंद होती. रस्त्यावर सर्वत्र सुकसुकाट होता. गावातील मुख्य रस्ता निर्मनुष्य होता. गावातील बँका, सरकारी कार्यालय यात देखील नागरिकांनी गर्दी केली नव्हती. सर्व कामाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
संसर्ग गावात पसरू नये व संसर्गाची साखळी तोडण्यात यश मिळावे, याकरता अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी यांनी 11 ऑगस्टला जाहीर सुचना आदेशित केली आहे. हे येथे उल्लेखनीय आहे.
 नवेगावबांध  येथे दिनांक 11 ऑगस्टला covid-19 च्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत नवेगाव बांध येथील कोरोना दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. गावातील सर्व घटकांना जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले होते. किराणा , भाजीपाला , सलून, फळविक्रेते, मटन, मच्छी, कोंबडी विक्रीची, सरकारमान्य मद्यविक्री , सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने, हॉटेल, चहाच्या पानटपऱ्या ,सोना विक्रेते, पीठ गिरण्या व इतर सर्व दुकाने जनता कर्फ्यू मुळे बंद ठेवण्यात  आली आहेत. covid-19 कोरोनाव्हायरस संसर्गाची  साखळी तोडून, संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात करिता  नवेगावबांध येथे दिनांक 12 ऑगस्ट रोज बुधवार ला  सायंकाळी 7.00 वाजेपासून  गावात जनता करतो  लागू करण्यात आला आहे.  या कर्फ्यू काळात शासकीय दवाखाना ,मेडिकल दुकान व दूध विक्रेता तसेच शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतशिवारातील निंदन, रोवणी, पिकांना खत देणे,  औषधी फवारणी आदी शेतीची  सर्व कामे सुरू आहेत. उर्वरित सर्व सेवा,आस्थापने व दुकाने बंद होती. एकीकडे सरकार मान्य दारूची दुकाने बंद असताना, दुसरीकडे अवैध दारू विक्री चे दुकाने सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, यावर स्थानिक प्रशासनाने पायबंद घालावा. तरच हा जनता कर्फ्यू  100% यशस्वी होईल. अशी  मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. असा प्रकार गावात घडू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. असे प्रकार करणाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले. विनाकारण ,मास्क न बांधता रस्त्यावर फिरणाऱ्या  अंदाजे दहा नागरिकांवर पोलिसांनी आज प्रत्येकी शंभर रुपये दंडाची कारवाई केली आहे.  नवेगावबांध पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे आपल्या ताफ्यासह जनता कर्फ्यू काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून लक्ष ठेवून आहेत. जनता कर्फ्यू शांततेत व सुव्यवस्थित पार पडले. कर्फ्यू काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.                        जीवनावश्यक वस्तूची देवाणघेवाण करत असतांना, तोंडाला मास्क ,रुमाल बांधावे तसेच वारंवार त्यांनी सॅनिटायझर चा वापर करावा. असे ग्रामपंचायत नवेगावबांध येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भाव पसरू नये. याकरिता दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. तसेच नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.12 ऑगस्ट बुधवार  च्या सायंकाळी सात वाजेपासून ते 16 ऑगस्ट रोज रविवार रात्री बारा वाजेपर्यंत जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन ग्रामपंचायत नवेगावबांध ने केले आहे.