अंनिस तर्फे विद्यार्थी-पालकांसाठी दूरध्वनी समुपदेशन (टेली कौन्सिलिंग) सेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जुलै २०२०

अंनिस तर्फे विद्यार्थी-पालकांसाठी दूरध्वनी समुपदेशन (टेली कौन्सिलिंग) सेवा


चंद्रपूर:- दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या दूरध्वनी समुपदेशन (टेली कौन्सिलिंग) सेवेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या वर्षी सुद्धा अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अभिन्न एज्युकेशनल अंड काउंसिलिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-पालकांसाठी दूरध्वनी समुपदेशन सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
कोविंड-19 मुळे बदललेल वातावरण, आधुनिक काळातील जीवघेणी स्पर्धा, असुरक्षितता, ताण-तणाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नकारात्मकरित्या प्रभावित होऊन त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणारे नैराश्य, आत्महत्येचे विचार व कृती हि नकारात्मक परिणामांची उदाहरणे आहेत, म्हणून ताण-तणावाचे योग्य नियोजन आवश्यक आहे, परंतु समाजात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती नसल्यामुळे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावी लोक अवैज्ञानिक व घातक प्रकाराला बळी पडतात. अशा नकारात्मक परिस्थितीमधून सावरण्यासाठी सकारात्मक, विवेकी, मानसशास्त्रीय मार्गदर्शन म्हणजे ‘समुपदेशन’ काळाची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर अशा समुपदेशन सेवेची नितांत आवश्यकता आहे. सदर समुपदेशन सेवेद्वारे तज्ञ समुपदेशक विद्यार्थी-पालकांना विविध समस्यांवर मार्गदर्शन करतील आणि गरजेनुसार मानसोपचार तज्ञाची सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल.
या महत्वपूर्ण दूरध्वनी समुपदेशन सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी ९४९२३५३९२६४, ९८६०२७२७७६, ८८०६७१३३८६, ९४०४१११९६८, ९८२२४००५५३, ९४२१७२१७८८, ९४२२९१३१७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा आणि परीक्षांच्या निकालाबाबत वैज्ञानिक-विवेकी दृष्टिकोन व सकारात्मक संवेदनशीलता विद्यार्थी-पालकांनी जोपासावी असे आवाहन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, चंद्रपूर जिल्हा संघटक अनिल दहांगावकर, जिल्हा अध्यक्ष तथा सिनेट सदस्य अॅड. गोविंदराव भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावडे, सहसचिव अनिल लोनबले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुजित खोजरे, तालुका संघटक प्रा. बालाजी दमकोंडवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे, संजय वासनिक, डॉ. शशिकांत बांबोडे यांनी केले आहे.


--