प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०२०

प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम


निफन्द्रा-अष्टविनायक बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा मार्च 2020 निकाल 100 टक्के लागला.परीक्षेला 31 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी प्राविण्य श्रेणीत , प्रथम श्रेणीत 8, द्वितीय श्रेणीत 2 उत्तीर्ण झाले.

दीपाली नानाजी नवघडे ही विद्यार्थिनी 92.40 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम,रुपाली बाबुराव उंदिरवाडे 91 टक्के गुण घेऊन दुसरी,शारदा रमेश मारभते 90.40 टक्के गुण घेऊन तिसरी आली.उत्तीर्ण सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष गजानन यनगंदलवार ,सचिव रवींद्र आडेपवार, संस्थापक विजय आडेपवार सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार, शिक्षक प्रदिप दोडके, विनोद बोरकर,गोविंदा बुरांडे,निखिल बुगावार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.