आई,ताई,जीजू तुमची मला खूप आठवण येणार.. तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा.असं म्हणत त्याने घेतली तलावात उडी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०२०

आई,ताई,जीजू तुमची मला खूप आठवण येणार.. तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा.असं म्हणत त्याने घेतली तलावात उडी

20171219_181809_large.jpg - Picture of Gandhi Sagar Lake, Nagpur ...
नागपूर (खबरबात):
लॉकडाउनमुळे तो बेरोजगार झाला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते.त्यामुळे तीन दिवसांपासून तो घरून बेपत्ता होता. नागपूरच्या त्यानंतर तो एक मित्र भेटला व त्याने मित्राला 'मी बेरोजगार आहे, जेवणसुद्धा केलेले नाही',असे डकाह नावाच्या मित्राला सांगितले. 

तीन दिवस डकाहने रोहितला घरी ठेवले, त्याचा सांभाळ केला. शुक्रवारी सायंकाळी डकाहने त्याला माटे चौकातील लोखंड चोरी करून आणण्यास सांगितले,याला त्याने विरोध केला.हा विरोध रोहितला महागात पडला. चोरी करायला लावणाऱ्या मित्राने तुझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या. आता तुला माझ्यासाठी चोरी करावीच लागेल. ते करायचे नसेल तर तुझ्या जेवणाचे २००० रुपये परत कर, पैसे न दिल्यास तुला ठार मारेल',अशी धमकी दिली. 

रोहित घाबरला आणि त्याने आत्महत्या करायचा निर्णय घेतला, आत्महत्येपूर्वी त्याने 'आई, मला तुझी, ताई आणि जिजूची खूप आठवण येणार आहे. तुम्ही सुखी राहा. तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा',असे चिट्ठीत लिहिले.आणि गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

रोहित आसोले (वय २५, रा. गोपालनगर) असे मृतकाचे नाव आहे. तो श्रद्धानंदपेठ भागात राहत होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. गणेशपेठ पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.गणेशपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली. या चिठ्ठीच्या आधारे पोलिस डकाहचा शोध घेत आहेत.