स्व.मातादिन जयस्वाल स्कूलचा निकाल १०० टक्के - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

स्व.मातादिन जयस्वाल स्कूलचा निकाल १०० टक्के

MSBSHSE SSC 10th Class Result 2020: दहावीचा निकाल ...
संग्रहित
वाडीत पाच शाळेचा निकाल १०० टक्के 
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात ):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात वाडीतील स्व. मातादिन जयस्वाल स्कूल ,विमलबाई तिडके विद्यालय ,जवाहरलाल नेहरू विद्यालय ,धरमपेठ इंग्रजी माध्यम शाळा ,जिंदल पब्लिक स्कूल या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून स्व. प्रबोधनकार विद्यालय ९९ . ०२ टक्के ,प्रगती विद्यालय ९१. ४८ टक्के ,श्री विश्वनाथबाबा हायस्कूल ८७. ८५ टक्के निकाल लागला आहे .
 स्व.मातादिन जयस्वाल स्कूल मध्ये समीक्षा उघाडे ९४ टक्के ,अंजली येडे ९३ टक्के ,आलीशा खान ९२. ४० टक्के ,अंशुल गजभिये ९२. ४० टक्के मार्क मिळाले .विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेश जयस्वाल ,सचिव जुगलकिशोर जयस्वाल यांनी अभिनंदन केले .विमलबाई तिडके विद्यालयात आयुष पाटील ९३ .४४ टक्के ,श्वेता शहारे ९१ टक्के ,दीक्षित बनकर ८८ टक्के मार्क मिळाले. विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अँड . मधुकर लापकाळे ,मुख्याध्यापीका साधना कोलवाडकर यांनी अभिनंदन केले . स्व. प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात अनुश्री पडोळे ९४. ४० टक्के ,प्राची कुथे ८८. ६० टक्के ,खुशबू खोब्रागडे ८७. ७० टक्के मार्क मिळाले.विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नारायण घोडखांदे ,संचालीका मिनाक्षी घोडखांदे , मुख्याध्यापीका अर्चना डायगव्हाणे यांनी अभिनंदन केले . जवाहरलाल नेहरू विद्यालयात हर्षल तांबटकर ९४. ४० टक्के ,भावेश डोंगरे ८८. ६० टक्के ,श्रध्दा झंझाड ८८. ६० टक्के मार्क मिळाले .विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे ,संस्थाध्यक्ष रणजीतबाबू देशमुख ,सचिव युवराजजी चालखोर ,मुख्याध्यापक सुरेंद्र सोहळे यांनी अभिनंदन केले . श्री विश्वनाथबाबा हायस्कूल मध्ये वैष्णव श्रीपाल ९३. ६० टक्के ,सुष्टी कुंभलकर ९१ टक्के ,सेजल पाचे ९०. ८० टक्के मार्क मिळाले .विद्यार्थ्यांचे संस्थाचालक राजेश जयस्वाल ,सचिव श्यामकुमार जयस्वाल ,मुख्याध्यापीका अनीता टोहरे ,उपमुख्याध्यापीका वीणा आखरे ,जुगलकिशोर जयस्वाल यांनी अभिनंदन केले . प्रगती विद्यालयात आदीत्य गौरखेडे ९४. ४० टक्के ,विशाखा डोंगरवार ९४. २० टक्के ,काजल जैतवार ९१.८० टक्के गुण मिळाले विद्यार्थ्यांचे संस्थाचालक अतुल देशमुख ,मुख्याध्यापीका नंदीनी पोजगे ,पर्यवेक्षक प्रज्वल काकडे यांनी अभिनंदन केले .आयुध निर्माणी डिफेन्स येथील धरमपेठ इंग्रजी माध्यम शाळेत सानिया सायतनुरकर ९२. २० टक्के , रुत्विक रुद्रकार ९२. २० टक्के ,पुनित साहेबसिंह ९१. ४० टक्के , अश्विनी साहू ९० . ६० टक्के मार्क मिळाले . विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष अॅड. संजय देशपांडे, सचिव रत्नाकर केकतपूरे, सहसचिव रामकृष्ण कुलकर्णी, चेअरमन दीपक दुधाने, प्राचार्य विजय मुंगाटे यांनी अभिनंदन केले .