द्रुगधामना हायस्कूल मध्ये मुलीच आघाडीवर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०२०

द्रुगधामना हायस्कूल मध्ये मुलीच आघाडीवर


नागपूर / अरूण कराळे ( खबरबात):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात दवलामेटी येथील डॉ .पंजाबराव देशमुख स्मृती शिक्षण संस्थेअंतर्गत असणाऱ्या द्रुगधामना हायस्कूलचा निकाल ९५ टक्के लागला आहे. एकुण ७९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते 
त्यापैकी गुणवत्ता प्राप्त ९ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत २१ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीत ३७ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांमध्ये मुलीच आघाडीवर आहे. प्रथम नगमा पठाण ८५ टक्के ,द्वितीय सरीता सिंग ८२.६ टक्के ,तृतीय प्रणाली जनबंधू ८२.४० टक्के ,वैष्णवी बेलोकर ८१.६० टक्के,स्नेहा गुडमेवाड ७९ टक्के ,उर्मिला तागडे ७८.८० टक्के मार्क मिळाले .सर्व विद्यार्थाचे संस्थेच्या कार्याध्यक्षा राजश्रीताई मुंदाफळे ,मुख्याध्यापक सुरेंद्र मोरे , शिक्षक अरूण कराळे ,लक्ष्मण खडसे, अशोक राऊत ,प्रमोद धुंदे, पुष्पा सोमकुवर, मंदा फालके ,वैशाली लोही ,आरती भोरे , ज्योती अढावू , सुनीता चव्हाण , वंदना मुसळे , वंदना जाभुंळकर ,वंदना वंगळ ,प्रकाश मस्के , नरेंद्र शेळके ,नामदेव खोपे ,विलास मुसळे ,विलास चौधरी , लक्ष्मण शिंदे, बंडू मोहोड , राजु शेळके ,मंजु शिंदे ,नामदेव राऊत, शंकर राऊत आदींनी अभिनंदन केले .